बहुचर्चित सुगाव आत्महत्या प्रकरणातील दोन आरोपींचा उच्च न्यायालयाकडून गुन्हा रद्द !

[ मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क ]
देगलुर : तालुक्यातील सुगाव येथे नोव्हेंबर 2021 मध्ये गावातील शंकर भोसले यांनी मुलीला सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी त्रास दिल्याच्या प्रकरणी आत्महत्या केली होती व त्यानंतर त्या मानसिक धक्क्यामुळे त्यांच्या मुलीचाही मृत्यू झाला होता, मृत शंकर यांच्या पत्नीने त्यांचा जावई व कुटुंबीय यांच्यावर आत्महत्तेस प्रवृत्त केल्या प्रकरणी भारतीय दंड संहिता 306, 498-A व 34 नुसार देगलुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता.

Order सुगाव display_pdf (4) (1)

आपल्यावर झालेला गुन्हा हा खोटा असल्याचे सांगत संबंधित आरोपींनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे ॲड. अविनाश सूर्यवंशी कावळगावकर यांच्या मार्फत आपल्यावरील गुन्हा (FIR) रद्द करण्यासाठी धाव घेतली होती. दरम्यान पोलीस तपासं अधिकाऱ्यांनी तपास पूर्ण करून दोषारोप पत्र दाखल केल होत, संबंधित प्रकरण मा. न्यायमूर्ती आर.जी.अवचट व संजय देशमुख यांच्यासमोर सुनावणीसाठी आले असता आरोपी, सरकार आणि फिर्यादीचे म्हणणं पूर्णपणे ऐकून घेऊन त्यातील आरोपी शिला व प्रणिता यांची कसलीही भूमिका नसल्याचे सांगत त्यांच्याविरुद्ध कुठलाही सक्षम पुरावा तपासा अंती मिळून आलं नसल्याचे निरीक्षण नोंदवत मा. उच्च न्यायालयाने त्यातील आरोपी शीला व प्रणिता यांच्यावरील गुन्हा रद्द केला आहे.
यावेळी आरोपींच्या वतीने ॲड.अविनाश सूर्यवंशी कावळगावकर यांनी बाजू मांडली तर ॲड. सुरेश पिडगेवार व ॲड.सिद्धांत सिरसाठ यांनी सहकार्य केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या