अतिवृष्टीमुळे पीक गेले, कुटुंबाचं पोट भरायचं कसं ? एका शेतकऱ्यांची आत्महत्या !

[ कुंटुर प्रतिनिधी – बालाजी हनमंते ]
नायगाव तालुक्यातील कुंटूर परीसरातील मौजे सालेगाव येथील अतिवृष्टीमुळे पीक गेल्याने आणि नापिकीला कंटाळून सालेगाव अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सालेगाव (कुं) येथे दि २७ आँक्टोबर गुरुवारी दुपारी 4 वाजता घडली. शिवशांत पंडित राचोटकर (35) असे मृताचे नाव आहे.
घटनेची माहिती सालेगाव येथील उपसरपंच राजु पाटील जाधव
यांनी पाेलिसांना माहीती दिली. कुंटूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय अटकोरे सर पो का इश्ववरे यांनी पंचनामा करुन आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शिवशांत यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी भाऊ असा परिवार आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या