सुजात आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडी सेविकांना साडी वाटप 

[ दिपक गजभारे ]
नवीन नांदेड – वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आद.सुजात आंबेडकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सुजाता बुद्ध विहार वसरणी येथे अंगणवाडी सेविकांना साडी वाटप करण्यात आले.

         वंचित बहुजन आघाडीचे नेते आद.सुजात आंबेडकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम म्हणून वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड दक्षिण महानगरच्या वतीने सामाजिक जिवनात महत्वाचा घटक असलेल्या अंगणवाडी सेविका,शिक्षिका तसेच आशा वर्कर चा साडी व मिठाई देऊन सन्मान करण्यात आला. 
      या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून युवा आघाडीचे सुदर्शन कांचनगिरे, जिल्हा महासचिव ॲड. वैभव लष्करे, महानगराध्यक्ष गोपालसिंग टाक, जिल्हा उपाध्यक्ष, दिपक माधवराव गजभारे घुंगराळेकर, पप्पू गजभारे, बौद्धाचार्य महेश गजभारे, नवयुग भीम जयंती मंडळाचे अध्यक्ष महेंद्र पोवळे हे होते.
       यावेळी हरीबाई पोवळे, जिजाबाई गजभारे, जिजाबाई पोवळे, जनाबाई पोवळे, शांताबाई पोवळे, चंद्रभागा कापसीकर, सुमनबाई गजभारे, तुळसाबाई गजभारे, उषाबाई पोवळे, उज्वला कांबळे, रंजना सोनकांबळे, आशा बनसोडे, शीला गजभारे, करुणा ढवळे, मंगल सावळे, अरुणा सावळे, ज्योती गजभारे, पिंकी सावंत, राम पोवळे, बंटी पोवळे, विशाल पोवळे, विश्वजीत पोवळे, यशवंत ढगे, राम जोगदंड आदींची उपस्थिती होती.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संयोजक शुध्दोधन कापसीकर यांनी केले तर आभार यश पोवळे यांनी व्यक्त केले.

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या