सुजाता खंदारे यांना अमेरिका विद्यापीठाची पीएचडी प्रदान !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
उमरी तालुक्यातील मौजे वाघाळा येथील रहिवासी तथा राष्ट्रीय पोषण संस्थान(ICMR ) हैद्राबाद येथे वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉ.अर्जुन खंदारे यांची मुलगी सुजाता अर्जुन खंदारे हिला अमेरिका विद्यापीठातील पेनीसीलव्हिया या विद्यापीठाने दिनांक 23 फेब्रुवारी रोजी पी.एच.डी. हि पदवी प्रदान केली आहे.
त्यांनी “mechanical response of tendons to common therapies and the effects of tendon injury progression.” हा संशोधनात्मक प्रबंध सादर केला आहे.त्यांना मार्गदर्शन डॉ.मेघन विदीत यांनी केले आहे. सुजाता खंदारे यांचे शिक्षण आय.आय.टी.मद्रास मधून एम.टेक. पूर्ण केल्यानंतर त्यांना वरील प्रबंध पूर्ण करण्यासाठी अमेरिकेतील पेनीसीलव्हिया या विद्यापीठाने फेलोशिप दिली होती.
तिच्या यशामध्ये तिची आई संध्या खंदारे यांचा खूप मोठा सिहांचावाटा असल्याचे तिने सांगितले आहे.त्यांच्या या यशाबद्दल डॉ. स्टीफन पिझ्झा,डॉ जुलियाना सी. सीमन, आई वडील अर्जुन खंदारे,संध्या खंदारे,आजी आजोबा जी.बी.वाघमारे, गोदावरीबाई वाघमारे, अभिमन्यू खंदारे,विशाल खंदारे, मीनल खंदारे,अपेक्षा खंदारे, अशोक कांबळे, दिलीप वाघमारे,आदीसह नातेवाईक व मित्रमंडळी यांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या