सुजलेगाव येथे ग्रंथालय आपल्या दारी हुतात्मा भगतसिंग वाचनालयातर्फे जि.प.प्रा.शाळेत उपक्रम साजरा.

[नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून या माध्यमातून शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक बौद्धिक विकास व्हावा यासाठी सुजलेगाव येथील हुतात्मा भगतसिंग वाचनालयाच्या वतीने केंद्रीय प्राथमिक शाळा येथे ग्रंथालय शाळेच्या दारी कार्यक्रम घेण्यात आला.
 कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय समितीचे अध्यक्ष रंगराव देशमुख व मुख्याध्यापक श्री मनोहर गादेवार सर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती देगावे सर जाकापुरी सर बाराळे सर मुक्कावार सर सौ. जळपतराव मॅडम श्री कालवले सर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाचनालयाचे ग्रंथपाल बळीराम जाधव यांनी शालेय विद्यार्थ्यांना महापुरुषांचे पुस्तक व कथासंग्रह सर्व विद्यार्थ्यांना देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांची सभासद नोंदणी करून घेण्यात आली व केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गादेवार सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून वाचनाच्या वतीने ग्रंथ देण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी जाकापुरी सर यांनी सर्वांचे आभार मानले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या