सुमनबाई कोपुरवाड यांना कला क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
      उदगीर येथील रगंकर्मी सहित्य कला क्रिडा प्रतिष्टानच्या वतीने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिला जातो. याच अनुषंगाने अर्जापुर येथील रहिवाशी सौ.सुमनबाई नागनाथराव कोपुरवाड यांना कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सदरील पुरस्कार दिनांक 16 जानेवारी 2022 रोजी उदगीर येथील रघुकूल मगंल कार्यालय येथे देण्यात येणार असल्याची माहीती रगंकर्मीचे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड यांनी दिले आहे. या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सचीव प्रा.ज्याेती मद्देवाड, अँड विष्णू लांडगे,महेश मळगे, रसूल पठान, रामदास केदार, दत्तकुमार स्वामी , मारोती भोसले, माहदेव खळूरे, रामेश्वर पटवारी ,सदींप मद्दे, सिद्धार्थ सुर्यवंशी, लक्ष्मण बेंबडे, सचिन शिवशेट्टे , प्रल्हाद येवरीकर, अनमोल कवडेकर, जहाँगीर पटेल आदींन केले आहे. तर हा पुरस्कार कोपुरवाड यांना मिळाल्याबद्दल अनेक नातलग व मित्रमंडळी यांनी शुभेच्या दिल्या आहेत.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या