सुनेगावच्या शाळेचा आदर्श इतरांनीही घ्यावा -संतोष नादरे
● लाॅकडाऊनच्या काळातील अत्युत्तम शैक्षणिक कार्याचे कौतूक ●
लोहा प्रतिनिधी/ दत्ता कुरावाडे
नांदेड दिनांक 2/9/2020
लाॅकडाऊनच्या कालावधितील ग्रामिण भागातील online शिक्षण प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेडचे पथक दि.01 आॅक्टोबर रोजी लोहा तालुक्यामध्ये आले होते.पथकप्रमुख जिल्हा कृषि विकास अधिकारी संतोष नादरे यांनी जि.प.के.प्रा.शा.सुनेगावच्या शाळेला भेट देऊन शाळेतून चाललेल्या online शैक्षणिक कार्याची पाहणी करून अतिशय समाधान व्यक्त केले.Lockdown काळातही शाळेने राबविलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतूक केले.
सध्या शाळा जरी बंद असल्या तरी शिक्षण चालू आहे.यावर्षी 15 जूनपासून शैक्षणिक कार्यास सुरुवात झाली.सुनेगावसारख्या ग्रामिण भागातून आकर्षक पद्धतीने चाललेले online शिक्षण व विविध शैक्षणिक उपक्रम आदर्शवत असून ते इतरांनाही प्रेरणा देणारे आहेत.असे मत पथकप्रमूख संतोष नादरे यांनी व्यक्त केले.
कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सुनेगावच्या शाळेने online शिक्षण ,Vertual classroom, सामान्यज्ञान प्रश्नपेढी,इंग्रजी संभाषण,मी होणार चित्रकार, शिक्षकमित्र,Pair Learning,ऐका माझी कविता,टिचकी मारा कथा ऐका,श्यामची आई संस्कार कथामाला,Thank a teacher,online स्पर्धा असे अनेक उपक्रम 15 मार्च 2020 पासून अखंडपणे व यशस्वीपणे राबविले.या सर्व उपक्रमांची सद्यस्थिती,प्रभावी आयोजन व यशस्विता पाहून पथकप्रमूख संतोष नादरे यांनी अतिशय समाधान व्यक्त केले.यावेळी त्यांनी गृहभेटीतून तपासलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासाची पाहणी केली.शिक्षकमित्र कु.किरण शिंदे व माधव पोशट यांनी केलेले अभ्यासगट शिक्षणप्रक्रियेला साहाय्यभूत व पोषक असल्याचे मत व्यक्त केले.शाळेचा अतिशय स्वच्छ परिसर,आदर्शवत शालेय स्वच्छता संकूल,वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन,शाळेतील भोतिक सुविधा याबद्दल शिक्षण विस्तार अधिकारी सौ.सरस्वती आंबलवाड,केंद्रप्रमुख डी.आर.शिंदे, मुख्याध्यापक लहू पंदलवाड व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.