कुंडलवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या सुनिता चौहान यांना सह्याद्री भूषण राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
         शहरातील सामाजिक कार्यकर्त्या सुनीता रघुनाथसिंह चौहान यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत परभणी येथील सह्याद्री बहुउद्देशीय संस्थेतर्फे देण्यात येणारा सह्याद्री भूषण राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मान्यवरांच्या उपस्थितीत सुनिता चव्हाण यांना सन्मानचिन्ह देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सुनिता चौहान या बिलोली तहसीलचे नायब तहसीलदार तथा कुंडलवाडी नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी रघुनाथसिंह चौहान यांच्या सौभाग्यवती आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या