उत्कृष्ठ अभियंता म्हणून अशोक गरुडकर यांचे कार्य -भास्करराव पाटील खतगावकर

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
स्वतः मोक्ष प्राप्त करणे यापेक्षा इतरांना मोक्षाचा मार्ग दाखवणे हे मोठे महान कार्य गुरुचे आहे. माझे गुरु स्वतःपेक्षा इतरांना अधिक महत्त्व देतात तेच कार्य मी करतो. अशोक गरुडकर हा शासकीय सेवेत उत्कृष्ट अभियंता म्हणून कार्य केलेला आहे. असे प्रतिपादन माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी केले. ते अभियंता अशोक गरुडकर यांच्या निवृत्ती निमित्त ३१ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक या नात्याने बिलोली येथील आनंद गार्डन येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडून आता मला काही अपेक्षित नाही एवढ्या मोठ्या माणसाकडून मी आता काही अपेक्षा ठेवत नाही. तर अशोक गरुडकर यांचा भविष्यातील राजकीय लाभ याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला अध्यात्माचा नाद आहे. यामुळे मी अनेक आध्यात्मिक कार्यक्रमात सहभाग घेतो.
या कार्यक्रमात मी अशोक गरुडकर यास सदिच्छा व आशीर्वाद देण्यासाठी आलो. यावेळी मला माझा कार्यकर्ता दिवंगत बाबाराव एबडवार याची आठवण येते. त्याच्याकडेच अशोक गरुडकर काम करत असे. अनेक पक्षाशी, अनेक लोकांशी, अनेक संघटनांशी, माध्यमांशी चांगले संबंध ठेवण्याची कला अशोक गरुडकर यास अवगत होती. तो उत्कृष्ट अभियंता आहे. प्रश्न सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर यांच्या विधानाचे उत्तर देताना भास्करराव पाटील खतगावकर म्हणाले की, तुम्ही आता आम्हाला केवळ पत्रकार म्हणून बघू नका. सर्व दृष्टीने सौख्य मिळाल्यानंतर आता काही घेण्याची इच्छा नाही. माझी दातृत्वाची भूमिका आहे. अशोक गरुडकर यांचा हवाला देऊन खासदारकी संपल्यानंतर गरिबांना 50 घर बांधून दिल्याचा उल्लेख करत, आता उर्वरित आयुष्य समाजासाठीच खर्ची घालणार असल्याचे विधान केले.
जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हवाला देत शासकीय सेवेप्रमाणे राजकारणातील निवृत्ती बाबत अप्रत्यक्ष उल्लेख केला ही बाब भास्करराव पाटील खतगावकर यांनी खोडून काढत, काय करायला हवे काय नको. याचा सल्ला यानंतर लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी यानंतर देऊ नये अशी सज्जड सूचना केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साईनाथ उत्तरवार यांनी केले यावेळी कार्यकारी अभियंता चितळे, कार्यकारी अभियंता रायभोगे, कार्यकारी अभियंता गंगथडे आदींची उपस्थिती होती. श्री अशोक गरुडकर यांच्या शासकीय आणि सामाजिक कार्यातील योगदानांचा अनेकांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट अभियंता या पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल आणि सेवानिवृत्ती झाल्याबद्दल अशोक गरुडकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचारी यासह अशोक गरुडकर मित्रमंडळांनी परिश्रम घेतले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या