हाजी मोहम्मद नवाब मोलिसाब यांचा सेवापुर्ती कार्यगौरव सोहळा

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
              येथील मुनवर मस्जिद येथील कार्यरत मौलवीसाहाब हाजी मोहम्मद नवाब मोहम्मद रहीमसाब यांनी मुन्वर मस्जिद येथे 53 वर्ष सेवा देत नुकतेच वयाचा 90 व्या वर्षी वयोमानानुसार सदिच्छा मौलवी पदाचा राजीनामा दिले आहे. त्याअनुषंगाने शहरातील त्यांचे माजी विध्यार्थ्यांचा वतीने त्यांचा सेवापुर्ती कार्यगौरव सोहळ्याचे आयोजन दि.30 जुलै रोजी दुपारी नमाजे जोहर नंतर आयोजित करण्यात आले असून शहर व परिसरातील सर्व तमाजी विध्यार्थी,मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
              कुंडलवाडी शहरातील मुन्वर मस्जिद येथे इ स 1971 पासुन आजतागायत पर्यंत वयाचा 90 व्या वर्षी तब्बल 53 वर्ष सेवा देत हाजी.मोहम्मद नवाब सहाब मौलवी पदाचा सदिच्छा सेवानिवृत्तीचा राजीनाम दिले.
हाजी मोहम्मद नवाब मोहम्मद रहीमसाब यांनी शहरातील तीन पिढीतील स्त्री,पुरूषांना अरबी,उर्दू विषयाचे ज्ञान देत,मुनवर मस्जिदीत तुटपुंज्या मानधनावर ईमामत पदाची सेवा बजावली,या सोबत एखाद्या परिवारात मुल जन्माला तर त्याचे विधीनुसार नाव ठेवने,विधिनुसार लग्न लावणे, तसेच अंत्यविधीस पुढाकार घेवून विधिनुसार कार्यवाही करणे आदी सेवा त्यांनी निस्वार्थ पणे बजावले आहे.
तसेच कोरोणाच्या संकट काळात एखाद्याच्या घरात कोणी दगावले तरी हाजी मोहम्मद नवाब मौलवीसाहाब यांनी आपले जिव धोक्यात घालून अंतविधीचे कौतुकास्पद कार्य केले,त्यांच्या या कार्याची दखल घेत माजी विध्यार्थ्यांचा वतीने त्यांचा सेवापुर्ती कार्यगौरव सोहळ्याचे आयोजन दि.30 जुलै रोजी दुपारी नमाजे जोहर नंतर मूनवर मस्जिद येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला व शहर परिसरातील सर्व त्यांचे माजी विध्यार्थी,मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येत उपस्थीत राहावे असे आवाहन त्यांच्या माजी विध्यार्थ्यांकडून करण्यात आले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या