महात्मा फुले हायस्कूल नाईकनगर चे मुख्याध्यापक भारत कलवले यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न !

(बिलोली ता.प्र – सुनिल जेठे)
मराठवाडा महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ नावंदी द्वारा संचलित महात्मा फुले हायस्कूल, नाईक नगर, नांदेड चे मुख्याध्यापक भारत माधवराव कलवले हे नियत वयोमानानुसार सेवामुक्त झाले असून त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा सोमवार दिनांक ३१ जुलै रोजी महात्मा फुले हायस्कूल नाईक नगर, नांदेड येथे संपन्न झाला.
    या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दलित मित्र पंढरीनाथ केंद्रे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक मुद्रीकाबाई केंद्रे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री.अमोलभाऊ केंद्रे, संचालक सौ.पुजाताई केंद्रे, प्रमुख पाहूणे प्रा.सी.एल.कदम, मुख्याध्यापक.एस के.केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती .
        यावेळी सेवानिवृत्तीनिमित्त मुख्याध्यापक भारत कलवले आणि सौ.वंदना भारत कलवले चि.विशाल कलवले, कु.अश्विनी कलवले यांचा पुर्ण आहेर, सेवागौरव सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ केंद्रे यांनी भारत कलवले यांनी केलेल्या कामाचे कौतुक करत कमी कालावधीत मुख्याध्यापक भारत कलवले यांनी शाळेचा नावलौकिक वाढविला असल्याचे गौरव उद्गार काढले.
    या प्रसंगी प्रा.सी.एल.कदम, मुख्याध्यापक श्री.एस.के.केंद्रे, एम.एन.गुंटूरकर, व्ही.एम.खवास पाटील, एस.एस सुंदाळे, अमोलभाऊ केंद्रे, यांनी भारत कलवले याविषयी कृतज्ञ भाव व्यक्त करत त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले.
शाळेतील विद्यार्थ्यांकडून आपले आठवणीतील अनुभव,प्रसंग व प्रशस्तीपत्र विचारव्यक्त केले. सोपान वाघमारे, प्रा.गणेश शिदे यांनी प्रसिद्ध साहित्यिक, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवा कांबळे लिखित क्रतिशील विद्यार्थ्यी प्रिय आदर्श मुख्याध्यापक : भारत कलवले हा गौरव लिखित स्वरूपात प्रकाशित प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. या कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी, नागरिक, पालक आदींची उपस्थिती होती. 
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्कीट खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही.एम.खवास पाटील यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार सहशिक्षक श्री एस.एस. सुंदाळे यांनी मानले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या