सेवापूर्ती गौरव सोहळा गुरुवर्य व मातृ पितृ ऋण यांची पुष्पा अर्चना तुला भार ह भ प समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन सोहळा !

[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
केंद्रीय मुख्याध्यापक जिल्हा परिषद ,केंद्रीय प्राथमिक शाळा मनोहर गंगाप्रसाद गादेवार यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्या निमित्ताने गुरुवर्य नागेश शर्मा महाराज आरमुर यांचा व मातृ पितृ कर्तज्ञता निमित्ताने श्री व सौ सुलोचना मनोहर गादेवार यांचा पुष्प अर्चना तुलाभार कार्यक्रम सुजलेगाव येथे दिनांक 7 जुलै 2024 रविवार रोजी जागृत देवस्थान हनुमान मंदिर येेथे होणार आहे.
सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत ह भ प समाधान महाराज शर्मा यांचा भव्य कीर्तन व सेवापूर्ती गौरव सोहळा होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण सोहळ्यात उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती पवन कुमार मनोहर गादेवार व गादीवर परिवार समस्त गावकरी मंडळी गावच्या वतीने करण्यात आली.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या