शिवतेज युवा जनकल्याण सेवा प्रतिष्ठाण चे अध्यक्ष सुरज गोविंदराव तेलंगे यांचा वाढदिवस साजरा !

लोहा तालुक्यातील बोरगाव (अ) चे सामाजिक कार्यकर्ते सुरज गोविंदराव तेलंगे यांनी स्वतः चा वाढदिवस कोरोणा संकटामुळे अगदी साध्या पध्दतीने पण सामाजिक भान ,सामाजिक बांधिलकी जपत व्रक्षरोपण ,व्रक्षवाटप तसेच अँटो रिक्षा चालकांना मास्क व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला.

या वाढदिवसाला महाराष्ट्रातील आमदार, खासदार मंत्री तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी वाढदिवसाला व्हिडीओ च्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या अशा अनोख्या पध्दतीने वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी प्रतिष्ठाण चे शिवराज पाटिल, सिद्धेश्वर एडके,अंगद पाटिल, आरविंद बारसोळे, माधव तेलंगे,उमाकांत बारसोळे, बालाजी गायकवाड,शुभम स्वामी,आदिची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या