सुतार समाजाला नागरी जमीन कायद्याअंतर्गत शेत जमीन वाटप न झाल्यास तीव्र आंदोलन – शिवानंद पांचाळ नायगांवकर !

[ दिनांक २३|०८|२०२१ ॥ अरूणकुमार सुर्यवंशी ]
छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना महाआघाडीने सुरू करून अठरा पगड जातीत बारा बलुतेदार उदरनिर्वाहात सक्षम व्हावा, बाराबलुतेदार सन्मान योजना सुरू करून गावगाड्याच्या कर्मात पिढ्यानपिढ्या शेकडो वर्षापासुन कार्यरत असलेल्यांना शेतकऱ्यांचे शेतीचे अवजारे, शेतकऱ्यांचे लाकडी लोंखडी कामाच्या सेवेत असलेल्या सुतार / लोहार समाजाला शेत जमिनी मिळाव्यात अशी मागणी – शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी राज्याचे महसूलमंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती.

त्या संविधानिक निवेदनाची कुठलीही दखल न घेतल्यामुळे, सुतार समाजाचे तथा ओबीसी युवा नेते शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी‌ संविधानिक लोकशाही मार्गाने महाराष्ट्र राज्यातील तमाम सुतार समाजाला घेऊन तीव्र आंदोलन करू असं परखड मत प्रसिद्धी माध्यमातून बोलताना व्यक्त केले आहेत.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या