स्वाभिमानी कुंभार समाज संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार !

( नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी )
उमरी तालुक्यातील २०२० – २०२५ साठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ओबीसी प्रवर्गातील विशेषता कुंभार समाजाचे बहुसंख्य प्रतिनिधी सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदासाठी निवडून आले असून त्यांनी नूकताच पदभार स्वीकारला आहे.
त्यानिमित्ताने उमरी तालुका स्वाभिमानी समाज संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष गंगाधर राजरवाड मनूरकर, यांच्या हस्ते उमरी येथे छोटेखानी कार्यक्रमात मौजे बोळसा ( खु.) सरपंच माधवराव निरदोडे, मौजे मंडाळा सरपंच नागेशराव कोंडलेवाड, मौजे हिरडगाव सदस्य दताहरी मल्हारे, मौजे बोळसा ( ग.प.) सदस्य भगवानराव निरदोडे,यासह आदी गावातील सरपंच उपसरपंच सदस्यांचा शाल, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात शंकरराव ईजगिरवाड, बाबूराव शिंगरवाड, माधवराव कस्तुरे, बालाजी राजरवाड, साईनाथ सिंगरपलू, आदींनी मार्गदर्शन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मास महाराष्ट्र न्युज पोर्टल सत्य बातमी पोहचवण्यासाठी अग्रेसर.

          www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या