जागर आंदोलनातून आमदार-खासदार जागे होत नसेल तर टाळक्यात मारून जागे करू- देवसरकर

स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर आक्रमक, लोकप्रतिनिधींना पुन्हा इशारा●

नांदेड/प्रतिनिधी-

लोकप्रतिनिधीच्या घरासमोर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड च्या वतीने जागर आंदोलन सुरू आहे,पण लोकप्रतिनिधीला स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या जागर आंदोलन या लोकशाही आंदोलनाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीला जाग येत नसेल तर आम्ही लोकप्रतिनिधीच्या टाळक्यात मारून जागे करु असा इशारा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांनी नायगाव तालुक्यातील रातोळी येथील आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या निवासस्थानासमोर आदोलंनातून दिला आहे..


मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती उठवावी तसेच नोकर भरती थांबवावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या घरासमोर जागर आंदोलन करण्यात आले. सत्तेतील आणि विरोधी पक्षातील झोपलेल्या लोकप्रतिनिधींना जागे करण्यासाठी हे जागर आंदोलन करण्यात आले.


मराठा आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात असून सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली आहे. या स्थगितीला पूर्णपणे राज्य सरकार व मराठा आरक्षण कृती उपसमितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण हे जवाबदार आहेत. तसेच केंद्र सरकारनेसुद्धा राज्यात स्वपक्षाचे सरकार नसल्याकारणाने राज्य सरकारला सहकार्य केले नसल्याने मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले, असा आरोप स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांनी केला. येणाऱ्या काळात मराठा आरक्षणासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. या मागणीचे निवेदन जागर आंदोलन करून आमदार राम पाटील रातोळीकर यांना देण्यात आले.


यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर, ग्रामीण दक्षिण जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील वाडेकर जिल्हाध्यक्ष सुनील पाटील कदम व दक्षिण जिल्हाध्यक्ष तिरूपती पाटील भगनुरे यांनी मनोगत व्यक्त करून सकल मराठा समाजाच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर, प्रदेश कोषाध्यक्ष गजानन माने कार्यकारी सदस्य मंगेश पाटील कदम, प्रदेश उपाध्यक्ष विजय पाटील कदम,
प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत पाटील मुळे
उत्तर जिल्हाध्यक्ष सुनील पाटील कदम, दक्षिण जिल्हाध्यक्ष तिरुपती पाटील भगनुरे,
दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील वाडेकर
विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष
वैभव पाटील राजूरकर
जिल्हा संघटक भागवत पाटील ढेपे जिल्हा सचिव राज शिंदे
उपाध्यक्ष माधव वडवळे, नांदेड तालुका अध्यक्ष नवनाथ पाटील जोगदंड ,
उमरी तालुकाध्यक्ष अविनाश पाटील हिवराळे, बजरंग जिगळेकर माधव पाटील डाकोरे योगेश शिंदे कैलास वडगावकर संभाजी जाधव योगेश हिवराळे
व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या