‘एक तारीख एक तास श्रमदान’ ह्या उपक्रमात के. रामलू शाळेचा सक्रिय सहभाग !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी-अमरनाथ कांबळे ]
         भारत सरकारने निर्देशित केल्यानुसार संपूर्ण देशामध्ये स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘एक तारीख एक तास श्रमदान’ या उपक्रमात कुंडलवाडी शहरातील के. रामलु पब्लिक स्कूल व नगरपालिका कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. या स्वच्छता उपक्रमाचे औचित्य साधून कुंडलवाडी नगरपरिषदेचे कर्मचारी व शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळेजवळील परिसर तसेच बसस्थानक परिसरात सामूहिक स्वच्छता करून नागरिकांमध्ये स्वच्छते विषयी जनजागृती केली आहे.

      यावेळी संस्थेचे अध्यक्ष सायरेड्डी ठक्कूरवार,संचालिका रमा ठक्कूरवार,प्राचार्य टी. नरसिंगराव, मुख्याध्यापक मठवाले, नगरपालिका कर्मचारी वंकर सहाणे,प्रकाश भोरे,मारोती करपे, शंकर जायेवार, मोहन कंपाळे, उमाकांत शिंदे, मारोती हातोडे, रामा हातोडे,दिलीप वाघमारे,वडेंना आरशेवार,सहशिक्षक कासलोड आर एस, दावलबाजे व्ही के, उमाकांत कुलकर्णी, कल्पना पुंजरवाड, आशा पेंडकर, शामला किनीकर, विकास मिसाळे, तेलकेश्वर सुजाता, शिवगंगा म्याकलवार, संध्या नरावाड, मृदुला धात्रक, भूषण कोलंबरे, संतोष भाले, दत्तराम लाड, गीता धात्रक, मयुरी कुलकर्णी, अश्विनी तुंगेनवार, अनुसया कोरडवार, रेखा घंटाजी, स्वामी सुरेखा, मनीषा पोरडवार आदीसह विद्यार्थी,नागरिक उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या