स्वदेश फाउंडेशन मार्फत करिअर प्रशिक्षण भापट येथे संपन्न !

[ रायगड म्हसळा प्रतिनिधि- प्रा.अंगद कांबळे ]

दि . २५ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ३ वाजता सार्वजनिक वाचनालय भापट येथे स्वदेश फाउ़डेशन नोकरी देणारे प्रशिक्षण कार्यक्रम एक पाऊल करिअरच्या दिशेने पार पडले.

या करिअर मार्गदर्शन प्रशिक्षणासाठी स्वदेशचे शिवतेज सर स्वदेश फाउ़डेशन म्हसळा तालुका मॅनेजर, मुर्ली सर म्हसळा तालुका शिक्षण विभाग मॅनेजर, चेतन सवादकर सर , स्वदेश ग्राम विकास समिती भापट अध्यक्ष प्रविण ठोंबरे, सदस्य नारायण पाष्टे, राजाराम बेटकर, रविंद्र कुवारे , अस्मित शिंदे, सिध्दांत शिंदे, समिर खेरटकर आणि समिती सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वदेश फाउ़डेशन मार्फत शैक्षणिक पात्रता नूसार कोर्सची माहिती देण्यात आली.
१.फूड अॅन्ड बेव्हरीज सर्विस – स्टिवर्ड २. असिस्टंट इलेक्ट्रेशन ३. डोमेस्टिक डेटा एन्ट्री आॅपरेटर ४. जनरल ड्युटी असिस्टंट ५. असिस्टंट वेल्डर ६. हेल्पर मेसन ७. असिस्टंट ब्युटी थेरापिस्ट ८. कंट्रक्शन‌ पेंटर ९. प्लंबर जनरल १०. जी.एस.टी. ११. डी. आर . ए. वरील कोर्स अत्यंत कमी शुल्कात करून मिळतील तसेच , या कोर्सचा ४६ दिवस कालावधी असून स्वदेश फाउ़डेशन मार्फत पुढील सहकार्य करून नोकरी मिळवण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त सोपे होईल. अशी माहिती देण्यात आली.

तसेच खेडोपाड्यातील अतिदुर्गम भागातील तरूणांना शिक्षणानंतर रोजगाराची संधी उपलब्ध होणे खुप काळाची गरज आहे. आणि शहरात जाऊन नोकरी करणे सध्या तरी खुप अवघड झाले आहे. म्हणून एखादे कौशल्य विकसित करून स्वताच्या पायावर उभे राहणे खुप आवश्यक आहे अशा परिस्थितीत स्वदेश फाउ़डेशने उचललेले पाऊल खुप महत्वाचे आहे. आणि भापट येथे वेळीच मार्गदर्शन होऊन एकुण ३० विद्यार्थी आणि युवक, युवतींनी सहभाग घेतला होता.

शिवतेज सर यांनी सांगितले की, गोरगरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. , उच्च शिक्षण साठी स्वदेश फाउ़डेशन सहकार्य करते. त्या त्या गावातील विकास समिती कार्यान्वित असणे आवश्यक आहे. त्या समितीच्या माध्यमातून स्वदेश सहकार्य करत असते. मुर्ली सर यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगून रोजगाराच्या संधी सांगितल्या . भापट या गावातील ३० विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या