भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व शासकीय वसतिगृह प्रवेश अर्ज करण्यास मुदतवाढ !

[ रायगड – अंगद कांबळे ]
सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातर्गत शासकीय वसतिगृह शासकीय निवासी शाळेत सन 2021-2022 वा शैक्षणिक वर्षा करीता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे दि. 28 फेब्रुवारी पर्यंत.मुदतवाढ देण्यात आलेली आहे असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण मुंबई विभाग, मुंबई वंदना कोचुरे यांनी केले.
मुंबई विभागातील रायगड जिल्ह्यातील जावळी ता, माणगांव येथे शासकीय निवासी शाळा असून समाज कल्याण विभागा मार्फ़त अनुसूचित जातीच्या विद्यार्थासाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जाते वसतिगृह प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही अश्या विद्यार्थ्यां करीता ही योजना राबविली जाते तरी अधिक माहितीसाठी संबधित जिल्ह्याचे साहयक आयुक्त समाजकल्याण कार्यालय यांच्याशी संपर्क साधवा असे आव्हान करण्यात आले आहे तसेच मुंबई विभागातर्गत मुंबई शहर या जिल्ह्यात मुलांचे 2 वसतिगृह, मुलींचे 1, मुंबई उपनगर या जिल्ह्यात मुलांचे 3 मुलींचे 3 ठाणे मुलांचे 4 तर मुलींचे 4 पालघर जिल्हा मुलांचे 1 रायगड जिल्हा मुलांचे 3मुलींचे 4रत्नागिरी मुलांचे 6 मुलींचे 4 सिंधुदुर्ग जिल्हा मुलांचे 3 मुलींचे 5 असे एकूण 41 वसतिगृह कार्यरत आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या