कुंडलवाडी येथे आज श्री अय्यप्पा स्वामी मंदिर व लक्ष्मीनृसिंह स्वामी मंदिराचे भूमिपूजन सोहळा

[ कुंडलवाडी प्रतिनिधी-अमरनाथ कांबळे ]
कुंडलवाडी येथील अय्यप्पा स्वामी मंदिर व लक्ष्मीनृसिंह स्वामी मंदिराचे भूमिपूजन आज दि. २ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता भूमिपूजन संपन्न होणार आहे.तसेच संध्याकाळी 5 वाजता अय्यप्पा स्वामींचे पालखी मिरवणुक काढण्यात येणार आहे. सदरील पालखी मिरवणूक श्री विठ्ठल साई मंदिर पासून ते जोड मारोती मंदिर, कुंडलेश्वर मंदिर ते बसस्थानक अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
तदनंतर संध्याकाळी ७ वाजता अय्यप्पा स्वामी महापडी पुजा व सुरेश दुगमोड गुरुस्वामी यांचे १८ वर्षे पूर्ण झाल्या मुळे याचे औचित्य साधून विशेष सन्मान कार्यक्रम तेलंगणाचे आरमूर येथील सुबाराव गुरुस्वामी यांच्या हस्ते पार पडणार आहे.सदरील कार्यक्रम कुंडलवाडी येथील अय्यप्पा सेवा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
 कार्यक्रमास तेलंगणातील हैदराबाद, कामारेड्डी, निजामाबाद,भैसा,तानूर, मुधोळ, बोधन, सालुरा, रुद्रर कोटगिर, पोतंगल तर महाराष्ट्रातील नांदेड, धर्माबाद, सगरोळी आदी गावातील दिक्षा घेतलेले स्वामी उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्रक्रमास जास्तीत जास्त भक्तगण आवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन रमना प्रसाद गुरु स्वामी,सुरेश दुगमोड गुरु स्वामी, वसंत गुरु स्वामी आदींनी आवाहन केले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या