न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविदयालयात श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह समारोप !

✍रायगड/म्हसळा ता.प्रतिनिधी-प्रा.अंगद कांबळे

विदयार्थ्याच्या सर्वांगीण व्यक्तीमत्वाची जडण घडण करण्यासाठी विविध शालेय उपक्रमाचे माध्यम आवश्यक्य आहे.

○ स्पर्धेत यश मिळो अथवा न मिळो हे फारसे महत्वाचे नाही पण आपली कार्यक्षमता आणि बुद्धीमता स्पर्धात्मक वातावरणात विकसित होण्यास अधिक मदत होते.असे प्रतिपादन प्राचार्य प्रभाकर मोरे यांनी केले. ○

न्यू इंग्लिश स्कुल कनिष्ठ महाविद्यलयामध्ये श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह निमित्ताने आयोजित केलेल्या विविध स्पर्धेत विदयार्थ्यांना या प्रसंगी पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी स्कुल कमिटीचे चेअरमन समीर बनकर तर या प्रसंगी जेष्ठ पत्रकार महेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री बनकर म्हणाले की, शालेय जीवनातील यश अपयश हे नेहमी यशस्वी जीवनाची पायाभरणी असते. जीवनात यशस्वी होण्यासाठी आपले व्यक्तिमत्व आजच्या वातावरणात पोषक बनविले पाहिजे.ज्यांना आपले शालेय जीवन यशस्वी करायचे आहे अश्या विदयार्थ्याने शालेय उपक्रमा मध्ये सहभाग घेणे गरजेचे आहे.

या प्रसंगी नेहरू युवा केंद्र म्हसळा तालुका समन्वयक श्री.मेंदवाडकरजी यांनी आपले मनोगत वेक्त केले. कार्याध्यक्ष अभय कुमारजी साळुंके यांच्या वाढदिवसा निमित्ताने ज्ञान शिदोरी या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांन पुस्तके देण्यात आले. चित्रकला, निबंध, वक्तृत्व या स्पर्धामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाण पत्र स्म्र्तीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमचे प्रास्ताविक प्रा.महंमद शेख सर यांनी केले. सूत्रसंचलन प्रा.सौ कल्पना शेटे यांनी केले तर आभार प्रा.कु.वैशाली खुताडे यांनी मांडले.कार्यक्रमास शिक्षक,प्राध्यपक,कर्मचारी,विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. 

ताज्या बातम्या