श्री स्वराज्य गणेश मंडळाच्या रांगोळी व चित्रकला स्पर्धेला प्रतिसाद

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
   शहरातील वंजारगल्ली येथे श्री स्वराज्य गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यात मुलांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून दि.२१ रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य रांगोळी स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते.या रांगोळी स्पर्धेत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.मुलींनी आपल्या कलेच्या माध्यमातून आकर्षक अशा रांगोळ्या काढल्या.पर्यावरण वाचवा असा संदेश देणारी रांगोळी, देवांच्या रांगोळ्या, ठिपक्यांची रांगोळी आणि नाचरा मोर अशा विविध प्रकारच्या रांगोळी काढण्यात आल्या.शहारातील नागरिकांनी रांगोळी पाहण्यासाठी गर्दी केली. स्वराज्य गणेश मंडळाच्या वतीने स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना वही व पेन भेट वस्तू म्हणून देण्यात आले.
       तसेच दि.२२ सप्टेंबर शुक्रवार रोजी मंडळाच्या वतीने मिलिंद प्राथमिक शाळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात शहरातील विविध शाळांच्या ५२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
पाणी वाचवा जीवन वाचवा,पर्यावरण संवर्धन,चंद्रयान ३, जिल्हा परिषद शाळा, प्रदूषण कमी करणे,प्लास्टिकचा वापर टाळणे, स्वच्छता अभियान आदी सामाजिक विषयावर विद्यार्थ्यांनी चित्र रेखाटले.यावेळी स्वराज्य गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ दि.२७ सप्टेंबर बुधवारी सायंकाळी पाच वाजता होणार आहे.या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल श्री स्वराज्य गणेश मंडळाचे शहरातील नागरिक कौतुक करित आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या