तहसीलदाराने स्कुटी वर येऊन केली धडक कार्यवाही अवैधरित्या रेतीची वाहातुक करणारे 9 ट्रॅक्टर लोहा तहसिलदारांनी पकडले !

■ दंडात्मक कार्यवाही सुरू.
■ वाळु माफीयांचे धाबे दणाणले.
—————————————
विशेष प्रतिनिधी – रियाज पठान

लोहा तालुक्यात अवैध रेतीची वाहातुक करणारे नऊ ट्रॅक्टर लोहा तहसिलदारांनी पकडून लोहा तहसिल कार्यालयात आनले आहे त्या वर कार्यवाही सुरू असल्याची माहिती नायब तहसीलदार अशोक मोकले यांनी दिली आहे.या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

लोहा तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून पेनूर, भारसावडा, चित्रावाडी, अंतेश्वर, येळी, हातणी, कौडगाव बेटसांगवी, आदी ठिकाणांहून गोदावरी नदी पात्रात पाणी असुन सुद्धा वाळू माफिया हे बिहारी मजूर लावून तराफे,व टोकऱ्या च्या सहायाने हजारो ब्रास वाळू उपसा करीत आहेत व हायवा (टिप्पर) द्वारे वाहातूक करून जादा दराने विक्री करीत आहेत.

बिहारी मजूर लावून तराफे व टोकऱ्या च्या सहायाने टॅक्टरद्वारे काढलेली रेती जमा करून जेसीबी च्या सहायाने हायवा व टिप्पर द्वारे वाहातूक होत आहे यांची माहिती मिळताच तहसीलदार विठ्ठल परळीकर, नायब तहसीलदार अशोक मोकले, तलाठी जाधव, तलाठी इंगळे, कांबळे,बोडावार,आदी नी पेनूर येथे जाऊन गोदावरी काठातील वाळू उपसा करणार्या नऊ ट्रॅक्टर वर कार्यवाही केली.

लोहा तहसिलदार विठ्ठल परळीकर हे नांदेड येथुन स्कुटी वर आले पेनूर येथे जात असताना त्यांना रस्त्यात भरदिवसा गोदावरी नदी पात्रातून रेती चोरून नेत असताना नऊ ट्रॅक्टर वर कार्यवाही केली आहे त्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले असून अवैध रेती कारवाई होत असल्यामुळे अनेकांनी पळ काढला आहे तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्या कारवाईमुळे सर्व प्रशासनामध्ये त्यांचे कौतुक होत असताना दिसत आहे घेऊन कारवाई केल्यामुळे जनतेमध्ये त्याबद्दल चांगलेच कौतुक होत आहे.

ताज्या बातम्या