पोलीस कर्मचाऱ्याचे लाचेची रक्कम स्वीकारून मोटरसायकल वरून पलायन; दोन हजाराची स्वीकारली लाच !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
पोलीस स्टेशन कुंडलवाडी येथील पोलीस हेड कॉन्स्टेबलत तैनात बेग मनसब बेग यांनी पोलीस स्टेशन कुंडलवाडी येथे दाखल असलेल्या एन.सी. मध्ये सी.आर.पी.सी कलम 107 प्रमाणे कार्यवाही करून प्रकरण मिटवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे चार हजार रुपयाची मागणी केली होती.
त्यानंतर तक्रारदाराने दिनांक 15 सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर संबंधित आरोपीसाठी दिनांक 20 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. त्यात आरोपी स्वतः दोन हजाराची लाच घेऊन अधिकाऱ्यांना चकमा देत मोटर सायकलवरून पळून गेला.
यासंदर्भात पोलीस हेड कॉन्स्टेबल तैनात बेग यांच्याविरुद्ध पोलीस ठाणे कुंडलवाडी येथे गुरन 103/ 2022 कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 सह कलम 201 भा.द.वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा सापळा डॉ.राजकुमार शिंदे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रर्यवेक्षण अधिकारी राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक अरविंद हिंगोले, संतोष शेट्टे, गजेंद्र मांजरमकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल एकनाथ गंगातीर्थ, संतोष वच्चेवार, सोनटक्के आदींनी रचला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद हिंगोले हे करीत आहेत.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या