तळेगाव ग्राम पंचायत निवडणूकीत महाविकास आघाडीचा विजय !

(नांदेड जिल्हा प्रतिनिधी-आनंद सुर्यवंशी)

उमरी तालूक्यातील सर्वात मोठ्या ग्राम पंचायतीचे निवडणूकीत एकूण 13 जागांपैकी 07 महाविकास आघाडी प्रणित ग्राम विकास पॅनेलला, 05 जागेवर भाजप प्रणित गोरठेकर गटाला आणि एका जागी अपक्ष उमेदवाराने विजय संपादन केला होता.

दिनांक 9 फेब्रुवारी रोजी ग्राम पंचायत चे सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक अध्यासी अधिकारी सिकंदर पठाण यांचे अध्यक्षतेखाली ग्राम पंचायत कार्यालयात पार पडली. सदर निवडणूकीत महाविकास आघाडी च्या सरपंचपदाच्या उमेदवार सौ. संतोषी सुरेशराव देशमुख ह्या भाजपा प्रणित गोरठेकर गटाच्या उमेदवार सौ. वेदांती सुरेश कप्पावार यांचा 09 विरुद्ध 04 मतांनी पराभव करून निवडून आल्या आणि उपसरपंच पदाचे निवडणूकीत महाविकास आघाडीचे आयुबखान हुसेनखान पठाण हे त्याचे प्रतिस्पर्धी भाजपा प्रणित गोरठेकर गटाचे उमेदवार रमिजबेग अहेमदबेग मोगल यांचा 08 विरुद्ध 05 मतांनी पराभव करून विजय संपादन केला.

सदर निवडणूक प्रक्रियेत अध्यासी अधिकारी सिकंदर पठाण यांना तलाठी गंगासागर आणि ग्राम विकास अधिकारी फुलारी यांनी सहकार्य केले.महाविकास आघाडीचे बाजूने अपक्ष उमेदवार मोगल अतिखबेगम एजाजबेग यांनी मतदान करुन सहकार्य केले आणि भाजपा प्रणित गोरठेकर गटाच्या एका सदस्याने सरपंच पदाला मत टाकून सहकार्य केले.

निवडणूक निकाला नंतर महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून,गुलाल उधळून व पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला.नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच आणि सदस्यांची त्यानंतर ग्राम पंचायत कार्यालयापासून ते देशमुखांचे वाड्या पर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.नवनियुक्त सरपंच सौ.संतोषी देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया देतांना सांगितले की, तळेगाव हे तालूक्यातील मोठे गांव असून विविध जाती, धर्माचे लोकं येथे शांततेत नांदतात.ह्या गावचे विकासाचे अनेक प्रश्न असून जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.अशोकराव चव्हाणसाहेब,माजी आमदार वसंतराव चव्हाण,उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी आणि माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली व सहकार्यातून गावचा सर्वांगिण विकास करण्यास प्राधान्य देईल आणि एक समृद्ध गाव म्हणून गावची जिल्ह्यात ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करेन असे प्रतिपादन केले.

सदर कार्यक्रमास संजय कुलकर्णी, दत्तात्रय देशमुख, मोहनराव देशमुख,सुरेशराव देशमुख,माधवराव जाधव, बशिरबेग पटेल,माजी सरपंच बालाजी नागलवाड,संतराम गुरुनवाड,लुखमानबेग पटेल,मैनुद्दीन पटेल,प्रल्हाद जाधव, व्यंकटराव माली पाटील,पप्पू खंडेलोटे,दत्ता बसवंते आदी कार्यकर्ते हजर होते.

ताज्या बातम्या