तालुकास्तरीय पाक कृती स्पर्धेत बावलगाव व चिरली जि.प.शाळा गुणाानुक्रमे प्रथम व द्वितीय !

[ कुंडलवाडी वार्ताहर – अमरनाथ कांबळे ]
-येथील गटसाधन केंद्रात तालुक्यातील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळेत स्वयंपाक बनविणारे व्यक्तीसाठी तालुकास्तरावर पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदरील स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावलगाव प्रथम तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली द्वितीय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थडी सावळी तृतीय क्रमांक पटकाविलेले आहे.
सदर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्रीमती अश्विनी कोतवाड ,श्रीमती ज्योती संगनोड मॅडम यांनी उत्कृष्ट व पारदर्शक परीक्षण करून निकाल जाहीर केले. सदरील स्पर्धेमध्ये बिलोली तालुक्यातून एकूण बारा सहभागी शाळा, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती ,केंद्रप्रमुख यांचे तसेच पारितोषिक प्राप्त शाळांचे आणि तालुका शालेय पोषण आहार प्रमुख श्री हर्षवर्धन घाटे यांचे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बिलोली बी. एम. पाटील यांनी अभिनंदन करून जिल्हास्तरासाठी सर्वांना भरभरून शुभेच्छा दिल्या.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या