तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आंतर भारती विद्यालयाचे यश

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
      बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे पावसाळी तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळा सहभागी झाले होते.सदरील स्पर्धेत आंतरभारती माध्यमिक विद्यालयाने वैयक्तिक खेळात नेत्र दीपक कामगिरी केली आहे.

यामध्ये वयोगट 14 प्रांजली गायकवाड गोळाफेक प्रथम, लोकेश देगावे गोळा व थालीफेक प्रथम, मिताली पिटलेवाड उंच उडी प्रथम, वयोगट 17 मध्ये अलका कदम थाली व गोळाफेक प्रथम, गायत्री बदेवाड लांब उडी प्रथम, आदी विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून त्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. तर तालुकास्तरावर वयोगट 17 मध्ये इलियास चाऊस 200 मीटर धावणे द्वितीय,ममता बळके 100 मीटर धावणे तृतीय, सोहम तुडमे उंच उडी द्वितीय,आदींनी यश मिळविले आहे.या विध्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक बालाजी पोरडवार, विजयकुमार गायकवाड यांनी मार्गदर्शन केले आहे…
      या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार गंगाधररावजी पटने,उपाध्यक्ष नंदाताई पटने, सचिव चंद्रशेखर पाटील सावळीकर, सहसचिव तथा मुख्याध्यापिका जयमाला पटने, मुख्याध्यापक विठ्ठल चंदनकर, सहशिक्षक माधव मोरे, शैलजा देशपांडे,लालू परसुरे, विजयकुमार गायकवाड, बालाजी पोरडवार, पद्मावती शिळेकर,अमरनाथ कांबळे,राम बादेवाड, सुधा दगडे, देवेंद्र पाटील,फरा शेख,आदींनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक केले आहे..
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या