तामसा येथील तलाठी प्रकरणाच्या निषेर्धात बिलोली तलाठी संघटनेचे लेखनी बंद आंदोलन ।

[ बिलोली प्रतिनिधी – सुनिल जेठे ]
हदगाव तालुक्यातील मौजे तामसा येथील जे.जे.हराळे नायब तहसिलदार, संजय बिराडे मंडळ अधिकारी, रुपेश जाधव तलाठी यांच्यावर खोटे गुन्हा नोंद केल्याने तेथील स.पो.नि.अशोक उजगारे यांची कायदेशीर चौकशी करुन तात्काळ निलंबन करण्यात यावे अशा मागणीचे बिलोली तलाठी संघटनेच्या वतीने लेखनी बंद आंदोलनाचे निवेदन २९ नोव्हेंबर रोजी तहसिलदार श्रीकांत निळे यांना देण्यात आले.
या प्रकरणी खोटे गुन्हे रद्द करुन स.पो.नि.उजगारे यांची कायदेशीर चौकशी करुन निलंबन करण्यात यावे या मागणीसाठी बिलोली तहसिलदार यांना निवेदन देऊन लेखनी बंद आंदोलन करण्यात आले.
यावेळी तलाठी संघटनेचे ता.अध्यक्ष एल.जी.तोटावाड, उपाध्यक्ष डी.टी. माळेगावकर, सचिव सचिन आरु यांच्यासह तलाठी गायकवाड, पवण ठक्करोड, अशोक गीरी, बाबूराव मुळेकर, माधव राजकुंडल, राजू मेहञे, संदीप सोनवणे व अदी तलाठी लेखनी बंद आंदोलनात उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 
युट्युब चॅनल सबस्क्राईब करा.फोटोवर क्लिक करून

ताज्या बातम्या