बिलोली शहरात भौतिक सुविधा उपलब्ध करुन द्या ; ऑल इंडिया तंजिम ए इंसाफची मागणी !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
बिलोली शहरातील अनेक भौतिक सुविधा अभावी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशा विविध मागणीचे निवेदन दि 25 फेब्रुवारी रोजी ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफ या सामाजिक संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी तथा न.प प्रशासक सचिन गीरी यांच्या कडे देण्यात आले.
त्यांच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत. जुना बसस्थानक येथे प्रवाशांसाठी बसण्यासाठी शेड (बस्थानक)उभारण्यात यावे, शहरातील बोधन मार्गावरील नाली व डिव्हायडरचे कामे राहिले आहेत ते त्वरीत पुर्ण करण्यात यावेत, राज्य महामार्गावरील बंद असलेले पथदिवे चालू करण्यात यावेत, (न.प. समोर, बस स्थानासमोर व देशमुख नगर समोरील), शहरातील नवीन बस स्थानक व जुना बस स्थानक येथे सार्वजनिक मुतारीची व्यवस्था करण्यात यावी, देशमुख नगर येथील नालीवरील तुटले स्लॅप तात्काळ नवीन टाकण्यात यावेत, तुकाराम नगर व प्रशांत नगर येथे राहिलेले रोड व नालीचे कामे तात्काळ करण्यात यावे, जुनी नगर परिषदेच्या जागेवर फळ व भाजीपाला व्यापाऱ्यांसाठी जागा खुली करण्यात यावी आदि मागण्या करण्यात आल्या.
तसेच वरील मागण्याच्या संदर्भात तात्काळ कोणतीच कार्यवाही नाही झाल्यास दिनांक 14/3/2022 रोजी अमरण उपोषण करण्यात येईल. असा इसारा देण्यात आला. निवेदनावर ऑल इंडिया तंजिम ए इंसाफचे बिलोली तालुकाध्यक्ष ए.जी कुरेशी, सचिव सय्यद रियाज, उपाध्यक्ष रफीयोद्दीन इनामदार, सदस्य मोहसिन खॉन आदीच्या स्वाक्ष-या आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या