पालक सभेला पालकांचीच गैरहजेरी,म्हणून ब्लू बेल्स इंग्रजी शाळेचे शिक्षक आपल्या दारी !

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
   आपल्या लेकरांची शैक्षणिक प्रगती चांगली आहे का, यात आपण समाधान आहोत काय की अजून आम्हाला काय प्रश्न करणार आहात याबाबत नायगाव शहरातील ब्लू ब्लेस इंग्रजी शाळेच्या वतीने आयोजित केलेल्या पालक सभेला पालक वर्गच उपस्थित राहत नसल्याने सदर शाळेचे शिक्षकवृंद यांनी मौजे अंतरगाव,वंजारवाडी या गावातील विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पाल्याशी आपल्या लेकराविषयी संवाद साधला आहे.

  सलग 14 वर्षापासून ब्लू ब्लेस इंग्रजी स्कूलने शंभर टक्के निकाल दिला असून याच शाळेतून अनेक विद्यार्थी यशाच्या शिखरापर्यंत पोहोचले आहेत.अशा दिशेने मार्गक्रमण करीत असलेली ही शाळा यातील सर्व शिक्षक वृंद यांना सदर शाळेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर के हरि बाबू आणि मुख्याध्यापिका सौ लक्ष्मी मॅडम यांचे मार्गदर्शन दररोज असते,विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जाबाबत पालक सभा आयोजित केल्यानंतर पालक वर्ग उपस्थित राहत नसल्याने डॉक्टर हरिबाबू आणि सौ लक्ष्मी मॅडम यांच्या आदेशाने शिक्षक शिक्षिका यांनी नायगाव तालुक्यातील मौजे अंतरगाव व वंजारवाडी या गावात जाऊन आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या घरी गेले त्यांच्या पाल्यांशी संवाद केला आपली लेकरं आमच्या शाळेबद्दल चांगल्या दर्जाची शिक्षण घेत आहेत काय, नुकतीच प्रथम सत्र परीक्षा संपली आपली लेकरं चांगले गुण प्राप्त केले आहेत म्हणून हातातील गुणपत्रिका दाखवीत अजून आम्हाला आपल्या लेकराबद्दल काय सांगू शकाल, आपणास पालक सभेला आमच्या शाळेचे निमंत्रण असतानाही आपण का व कशामुळे उपस्थित राहू शकले नाही असा शिक्षकांनी प्रश्न केल्यानंतर पालक म्हणाले की आम्ही गोरगरीब शेतकरी शेतमजूर आम्हाला इंग्रजी विषयाचे मुळीच काही समजत नाही आणि शेतातील विविध कामामुळे वेळच मिळत नाही मजूरदार पालकांनी देखील असेच उत्तर दिले पण आपल्या शाळेबद्दल व तुमच्या शिक्षणाबद्दल आम्ही मात्र खूप समाधानी आहोत असेही उत्तर यावेळी पालकांनी दिले.
www.massmaharashtra.com 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या