शिक्षकच राष्ट्र घडू शकतात – डॉ.गोविंद नांदेडे

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
कृष्णूर – नायगाव तालुक्यातील जय भवानी माध्यमिक विद्यालय जुनियर कॉलेज कृष्णूर येथे शाळेचे मुख्याध्यापक श्री एस जी मोरे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांचा दिनांक 1 फेब्रुवारी 2022 रोजी विद्यालयाच्या प्रांगणात भव्य निरोप समारंभ घेण्यात आला. याप्रसंगी नांदेड साहेब बोलताना म्हणाले, मुख्याध्यापक एक व्यक्ती नसून एक संस्था आहे.

राष्ट्राचा उद्धार केवळ शिक्षकच करू शकतो. भावी पिढी घडविण्याचे कार्य केवळ शिक्षक आणि मुख्याध्यापक करू शकतात. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.तर श्री राजेश कुंटूरकर म्हणाले संस्थेने कृष्णूर आणि परिसरातील गावांसाठी शाळेची भव्य इमारत आणि विस्तृत मैदान उपलब्ध करून दिले आहे, त्यासाठी कृष्णूर व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी शाळेचा सुयोग्य वापर करून शैक्षणिक विकास घडून आणावा. कार्यक्रमाचे अध्यक्ष गोदावरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री राजेशजी देशमुख कुंटूरकर तर प्रमुख वक्ते माननीय श्री डॉ. गोविंद नांदेड होते.

व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती श्री बाळासाहेब धर्माधिकारी, संजय पा.शेळगावकर श्री परबतराव पा. जाधव, कृष्णूरच्या सरपंच श्रीमती सारजाबाई जाधव होते. उपसरपंच संदीप कागडे, श्री रावसाहेब पा. जाधव, सामाजिक कार्यकर्ते कामाजी वाघमारे ,लक्ष्मण पा.जाधव, वाघमारे, व्यंकटराव नकाते, टी एम. पाटील, मुख्याध्यापक बनाळीकर, बालाजी हिवराळे ,शिवराज पा. जाधव, बळवंत पा. जाधव , तसेच गावातील पदाधिकारी, नागरिक, महिला भगिनी, पंचक्रोशीतील नागरिक ,आजी-माजी विद्यार्थी, तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम एम पाटील आणि व्यंकट आनेराये यांनी सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. जय भवानी माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक म्हणून श्री नागनाथ मठपती यांच्याकडे श्री राजेशजी कुंटूरकर आणि डॉ.गोविंद नांदेडे यांच्या शुभहस्ते मुख्याध्यापक पदभार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक विद्यार्थी आणि गावातील नागरिकांनी विशेष प्रयत्न केले. शाळेचे पांचाळ सर यांनी सूत्रसंचालन व आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगतासांगता करण्यात आली.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या