गंगणबिड येथे केंद्र स्तरीय शिक्षण परिषद संपन्न !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
       नायगाव तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र गंगणबिड येथील महादेव मंदिरात केंद्र स्तरीय शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली.  दि.२४ आॅगस्ट २०२२ रोजी बुधवारी गंगणबिड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षण परिषद घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायगावचे केंद्र प्रमुख शिवराज साधु सर हे होते.
तर यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी एम.जे.कदम सर, मु.अ.पचलिंग सर,कोटूरवार सर, बोमनाळे सर, मुंडकर सर यासह पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील पवार सर, शेख सर यासह आदिजन उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद शाळा नायगाववाडी, अमृतनगर,गोळेगाव यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रास्ताविक नायगाववाडी येथील सहशिक्षक विजय चव्हाण यांनी केले त्यानंतर कदम सर, साधू सर, जांभळीकर सर, कंधारकर सर, शेख सर यांनी आपले विचार मांडले सुत्रसंचलन विरभद्र मिरेवाड सर व आभार साधु सर यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भोगाजे सर, वडजे सर, कोत्तावार सर, बोमनाळे सर यांनी परिश्रम घेतले. यावेळी गावातील नागरीकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या