जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा सुनेगाव येथे डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिन साजरा !
( लोहा शहर प्रतिनिधी – दत्ता कुरवाडे )
आज दिं 5 संप्टेंबर 2020 रोजी जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा सुनेगाव येथे डॉ सर्वपल्ली राधकृष्णन यांच्या जयंती निमित शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सध्या शाळा बंद पण ऑनलाईन शिक्षण चालू आहे . प्रत्येकाच्या जीवनात गुरूला फार मोठे स्थान आहे . गुरु मोठा मानावा की देव . असे स्थान गुरूला आहे.
आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने सुनेगांव शालेय समितीचे अध्यक्ष श्री जाधव व केंद्राचे केंद्रप्रमुख श्री डी आर शिंदे सर यांनी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री शिर्शिकर सर व उपस्थित सर्व शिक्षकांचा पुष्पहार देऊन गौरव केला..
यावेळी अखिल शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री मुर्तुज शेख सर , श्री शिरशिकर सर , श्री सय्यद सर , श्री कुलकर्णी सर , सौ. कुलकर्णी मॅडम, सौ . निशा भंडारे मॅडम उपस्थित होते.