नायगाव येथील मिलेनियम पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
 शिक्षक दिनानिमित्त मिलेनियम पब्लिक स्कूल नायगाव येथे शिक्षक दिनी शिक्षकांचा सन्मान कार्यक्रम अतिशय थाटामाटात साजरा करण्यात आला. प्रथम कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य एस एम वडजे तर प्रमुख पाहुणे म्हणून आनेराये सर उपस्थित होते. शिक्षक दिनानिमित्त मिलेनियम पब्लिक स्कूल येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अमूल्य असं मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक कसा असावा शिक्षकातील शिस्तबद्धता आणि शिक्षकांमधील गुणवत्ता या संदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचे गौरव करुन शिक्षक दिनी‌ शुभेच्छा दिल्या आहेत व त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष मा. श्री शिवराज पाटील होटाळकर यांच्या माध्यमातून सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या शुभ प्रसंगी सहशिक्षक एस एन देगावे, एम जी व्यवहारे, एस व्ही मठपती, के एस चव्हाण, आर जी सोनमनकर, सौ. जी एस जाधव, सौ. एम बी पाटील, एस एस देशमुख, सौ.आर डी दुलेवाड, सौ. एस बी हंबर्डे, सौ. व्ही बी शिंदे, ए एम केरुरे, सौ.ए डी गायकवाड, जी डी होकर्णे.जी एस पांचाळ, सौ ए जे बेळगे, सौ.एस ए पारवेकर, एस आर चन्नावार, सौ.भोसले मॅडम, सौ.तळेगावे मॅडम, एस आर वाकारडे, डी.जी.देगलुरे, ए जी वल्हे, पी बी नातेवार, सौ.पी जी जाधव, एस आर जाधव, एस भालेराव, सौ.चव्हाण मॅडम, सौ.मुस्कान मॅडम, सौ.लाब्दे मॅडम, सौ.तमलुरे मॅडम, सौ.के जी थेटे, सौ.एन अ सिदीकी. व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या