विद्यार्थ्यांना जागरूक करण्याचे काम शिक्षकांनी करावे – कुणाल लोहगावकर!

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
विद्यार्थ्यांना अभ्यासात व शैक्षणिक कामात शिक्षकांनी वेळोवेळी जागरूक करण्याचे काम करावे व त्यांच्याकडून भरपूर अभ्यास करून घ्यावा असे प्रतिपादन सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मिलिंद प्राथमिक व मिलिंद विद्यालय चे अध्यक्ष कुणाल लोहगावकर यांनी केले.
ते येथील मिलिंद विद्यालयाचे ज्येष्ठ सहशिक्षक एच.टी. राऊत यांच्या सेवानिवृत्तीबद्दल आयोजित केलेल्या निरोप समारंभात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कुणाल लोहगावकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक विभागाचे प्रभारी मुख्याध्यापक डी.एस .पांचाळ तर माध्यमिक विभागाचे प्रभारी मुख्याध्यापक एच. एन. पांचाळ व निरोप मूर्ती श्री .व सौ. राऊत उपस्थित होते .पुढे बोलताना लोहगावकर म्हणाले की, कोरोना काळात विद्यार्थ्यांचे प्रचंड प्रमाणात शैक्षणिक नुकसान झालेले आहे. हे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रत्येक शिक्षकांनी याचे नियोजन केले पाहिजे व वेळोवेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढले पाहिजे. निरोप मूर्ती एच.टी. राऊत यांच्या संबंधित बोलताना म्हणाले की ,एच.टी. राऊत हे आपल्या कोणत्याही कामात नेहमी तत्पर राहायचे.
अध्यापनाचे काम करीत असताना ते कार्यालयीन कामात सुद्धा तेवढेच तत्पर होते. त्यांचे व्यक्तिमत्व हे एक बिन तक्रारीचे होते. याप्रसंगी निरोप मूर्ती एच.टी. राऊत यांच्या निरोप समारंभ निमित्त हिमायतनगर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक अनगुलवार, सब्बनवार प्रशालेचे मुख्याध्यापक कल्याण गायकवाड ,प्रा. शुद्धोधन गायकवाड, सुभाष दरबस्तेवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी एच.टी. राऊत यांचा संस्थेतर्फे व शाळेतर्फे कपडे रुपी आहेर देऊन सत्कार करण्यात आला .तर एच.टी. राऊत यांच्याकडून शाळेला अहुजा कंपनीचे साऊंड सिस्टम भेट देण्यात आले. या निरोप समारंभाच्या कार्यक्रमास निमंत्रिता मध्ये नरेश रयाकावार, गंगाराम कदम, सौ प्रेमलाबाई कदम, गंगाप्रसाद कानकट्टे, नामदेव राऊत, के.टी. राऊत यांच्यासह प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एस. आर. तेलगाने यांनी केले तर उपस्थित त्यांचे आभार एस.डी. चंदनकर यांनी मानले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या