म्हसळा येथील शिक्षकांचा दैनिक रयतेचा कैवारी आदर्श गुरु गौरव पुरस्कारने सन्मान !

[ रायगड/म्हसळा प्रतिनिधी – प्रा.अंगद कांबळे ]
आज दिनांक 19/10/2021 रोजी रयतेचा कैवारी या शैक्षणिक समृद्धीसाठी कटिबद्ध डिजिटल दैनिक यांच्या मार्फत दिला जाणारा या वर्षीचा गुरू गौरव पुरस्कार रयतेचे राजे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व विषमते विरुद्ध लढा पुकारणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पदस्पर्शाने पुनीत झालेल्या रायगड जिल्ह्यातील महाड नगरीत शिक्षकांचा गुणगौरव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथे संपन्न झाला.

म्हसळा तालुक्यातील गुणवंत शिक्षक की ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करून म्हसळ्याच्या विद्यार्थी विकासात आणि सामाजिक जाणिव जागृती करून मागासलेल्या समाजाला अंधाराच्या खाणीतून बाहेर काढून, अज्ञान दूर करून शिक्षणाच्या वाटा घरापर्यंत नेण्याचे दैदीप्यमान काम करणाऱ्या वरवठणे केंद्रातील आदरणीय असे व्यक्तिमत्व असणारे, विद्यार्थी प्रिय शिक्षक श्री अशोक सहाणे सर, बागाचीवाड़ी सालविंडे रा. जि. प शाळा, व् आगरवाड़ा रा.जि.प.शाळा येथील अभ्यासू व्यक्तिमत्व , मार्गदर्शक आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक श्री नितिन गर्जे सर, आणि दिलीप शिंदे रा.जि. प शाळा चिखलप आदिवाशिवाडी, यांचा दैनिक रयतेचा कैवारी आदर्श गुरु गौरव पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी संपादक श्री शाहू संभाजी भारती, कार्यकारी संपादक मिट्टू आंधळे, किल्ले रायगड महाड चे आमदार मा भरतशेठ गोगावले , महाड नगरपरिषदेच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा स्नेहलता जगताप, महाड प स सभापती मालुसरे मॅडम, जि प सदस्य कचरे साहेब, काळीजकर साहेब, राज्यध्यक्ष राजेशजी सुर्वे सर यांच्या हस्ते सम्पंन्न झाला महाड तालुका प्रतिनिधी बालाजी गुबणारे यांनी व त्यांच्या टीम ने कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या