आयुक्त कार्यालयावर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी महामोर्चा चे आयोजन !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
—————————————
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळ दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी आयुक्त कार्यालय पुणे येथे 2005 पासून शिक्षकेत्तरांवर होत असलेल्या अन्याया बाबत व शासनाच्या उदासीन धोरणाबाबत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महामोर्चाच आयोजन केले आहे. यातील प्रमुख मागण्या..
1 ) शिक्षकेत्तरांना आश्वासित प्रगती योजना 10, 20, 30 त्वरित लागू करावी 2) सेवकांची नियमित भरती चालू करावी.                                               3 ) जुनी पेन्शन योजना लागू करावी .                                                     4) समान काम समान वेतन या शासनाच्या निर्णयानुसार बक्षी खंड दोन मध्ये सुचविलेल्या शिफारशी त्वरित लागू कराव्यात इत्यादी मागण्यांकरता महामोर्चा मध्ये महाराष्ट्रातील सर्व शिक्षकेत्तर बांधवांनी उपस्थित रहावे जर, तर, ची भाषा न वापरता मोर्चात मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन संघटनेची ताकद दाखवून द्यावी. असे आवाहन नांदेड जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गोपाळ पेंडकर, कार्याध्यक्ष प्रकाश देशमुख, विभागीय कार्यवाह विजय देवडे, उपाध्यक्ष रामदास पाटील, सरवरोद्दीन सिद्दिकी, श्रीमती कुलकर्णी, लक्ष्मण कोपरे, सचिव मोहम्मद फारुख पाशा, शिवाजीराव केंद्रे कंधार, आनंद धुप्पे मेहुल धावडा, सचिन वर्तले, विजय चव्हाण, दिलीप जाधव देगलूर, कारेगावकर धर्माबाद कदम उंमरी, बालाजी इंगळे मुखेड, रमेश बाळकोडकर व प्रसिद्धीप्रमुख नागोराव लोलापोड यांनी केले आहे.
तरी शिक्षकेतरांना विनंती की आपण या महामोर्चा मध्ये सहभागी होऊन संघटनेची ताकद दाखवून द्यावे असे आवाहन शिक्षकेतर कर्मचारी संघनेचे जिल्हा अध्यक्ष गोपाळराव पेंडकर यांनी केले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या