कास्ट्राइब शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ रायगड ज़िल्हा नोंदणी सुरु !

[ रायगड / म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे ]
कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघ संलग्न शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र कास्ट्राईब शिक्षक शिक्षकेत्तर महासंघ प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि वरिष्ठ महाविद्यालय मधील शिक्षक, प्राध्यापक, आणि शिक्षकेत्तर यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सज्ज आणि सक्षम आहे.
संपूर्ण महाराष्टात नव्याने नोंदणी करून ज़िल्हा व शाखा कार्यकारणी निवड प्रक्रिया सुरु असून रायगड ज़िल्हा प्रभारी प्रा. विनयकुमार सोनवणे ( 8421432351.) यांच्या नेतृत्वाखाली नोंदणी अभियान सुरु करून लवकरच यातून ज़िल्हा व तालुका कार्यकारणी निवड करून शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महाराष्ट्र प्रभारी यांनी काल नाशिक येथे रायगड प्रभारी यांना नियुक्ती पत्र देताना सांगितले.
या वेळी रायगड ज़िल्हा प्रभारी सोनवणे यांनी ज़िल्हा मधील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या नंबर वर आपली माहिती whats app करावी. आपण लवकरच तालुका निहाय दौरा करून सर्वांची भेट घेऊन सर्व संमती ने ज़िल्हा व तालुका कार्यकारणी निवडू असे जाहीर केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या