पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी उच्च माध्यमिक शिक्षकांनी 8 ऑक्टोबर पर्यंत नाव नोंदणी करावी
( नांदेड दि. 6 :- शेख मोईन )
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत येणा-या क.महाविद्यालयातील व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी इ. 12 वी, पुनर्रचित अभ्यासक्रमाचा मूल्यमापन आराखडा व त्या तदनुषगिक बाबीसंदर्भात सर्व विषयांचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे, हे प्रशिक्षण घेणे सर्व क.महाविद्यालयातील व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी अनिवार्य आहे. या प्रशिक्षणासाठी उच्चमाध्यमिक कनिष्ठ महाविदयालयातील सर्व विषय शिक्षकांची ऑनलाईन नाव नोंदणी करुन घेण्यात येत आहे. उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी प्रशिक्षणास प्रविष्ठहोण्यासाठी मंडळाच्या evaluation.mh-hsc.ac.in या वेबसाईटवर दिलेल्या विहित प्रपत्रात/ फार्म मध्ये आपली माहिती दि. 1 ते 8 ऑक्टोबर 2020 या कालावधीत भरावयाची आहे.त्यानंतर सदर लिंक बंद केली जाईल. तरी उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विषय शिक्षकांनी इ. बारावी,पुनर्रचित अभ्यासक्रमाचा मूल्यमापन आराखडा व तदनुषंगिक बाबींसंदर्भात ऑनलाईन प्रशिक्षणासाठी विहित मुदतीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.