संताची शिकवणूक आजच्या पिढीने जोपासणे गरजेचे – समतादुत सोंडारे !

[ प्रतिनिधी – दिपक गजभारे ]
भारतात खुप संत होऊन गेले प्रत्येक संतांनी समतेचा संदेश देऊन भेदभाव नष्ट करण्याचे काम केले. म्हणुन आजच्या पिढीला संताचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. असे प्रतीपादन नायगांव तालुका समतादुत दिलीप सोंडारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.

दि.23 फेब्रूवारी रोजी जिल्हा परिषद कन्या हायस्कुल नायगांव (बा) येथे संत गाडगेबाबा व संत रविदास यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी समतादुत प्रमुख व्याख्याते म्हणुन बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आनंद रेणगुंटवार उपस्थित होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन मुख्याध्यापक गाजलवाड होते.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत संस्था (बार्टी) चे नायगांव तालुका समतादुत दिलीप सोंडारे पुढे बोलताना म्हणाले की, कोणत्याही संताचे काम एका समाजासाठी नव्हते तर तमाम समाजासाठी त्यांनी आपले जिवण झिजवले आहे.
कोणत्याही संताला जात- पात, स्त्री – पुरुष, विषमता, अंधश्रद्धा मान्य नव्हती. अनिष्ट रुढी परंपरेला प्रखर विरोध केला. सर्व समाजात समता, बंधुता जोपासन्याचे पवित्र कार्य संतानी केलेल असुन त्याच धरतीवर भारतीय संविधान डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहले असुन ते संविधान सर्वांनी अभ्यासावे असे आवाहन या वेळी केले.
सदर प्रबोधन कार्यक्रम जिल्हा प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी सर्व शिक्षक – शिक्षीका व विद्यार्थी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या