तेलंगणाचे खासदार टी जी व्यंकटेश यांची महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेने घेतली भेट.

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने तिरुपती येथील बांधण्यात येणाऱ्या भक्त निवासाचा आराखडा महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांच्यासह शिष्टमंडळाने राज्यसभेचे खासदार टी जी व्यंकटेश यांची भेट घेऊन स्वागत केले.
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने तिरूपत येथे बांधण्यात येणा-या भक्त निवासाच्या बांधकामाचा तयार करण्यात आलेला प्राथमिक स्वरूपाचा आराखडा आज रोजी संस्थेचे अध्यक्ष व तेलंगानातील कर्नूल येथील समाज भूषण तथा राज्यसभेचे मा. खासदार आदरणीय टी. जी.व्यंकटेश सर यांना सादर करून त्यांचा महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, महासचिव गोविंदराव बिडवई, बांधकाम समितीचे सभापती भानुदास वट्टमवार, काशी अन्नसञमचे विलासजी बच्चू, राज्य प्रसिद्धीप्रमुख नरेंद्र येरावार, राज्य सदस्य साईनाथ मेडेवार, लक्ष्ममया, श्रीनिवास सर आदी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या