नगरपरिषदेने केले शहरातील मंदिरांची साफसफाई !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
         स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांनी स्वच्छ तीर्थ मोहीम राबविण्याचे निर्देश दिलेले आहेत.

त्या अनुषंगाने आज दि. १९ रोजी शहरामध्ये स्वच्छ तीर्थ अभियान अंतर्गत कुंडलेश्वर मंदिर,राम मंदिर जोड मारुती मंदिर, काळा मारुती मंदिर, व्यंकटेश मंदिर, महालक्ष्मी मंदिर, पोचंमा देवी मंदिर गजानन महाराज मंदिर आदी.ठिकाणी मुख्याधिकारी आर.जी.चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली साफ सफाई करण्यात आले.

       यावेळी न.प.अधीक्षक श्री.सुभाष निरावार, प्रवीण शृंगारे, मुंजाजी रेनगडे, बालाजी टोपाजी, हेमचंद्र वाघमारे, मारोती करपे, प्रकाश भोरे, शंकर जायेवार, धोंडीबा वाघमारे,भरत काळे, साहेबराव वाघमारे, विजय वाघमारे, शुभम धिल्लोड, सर्व सफाई कर्मचारी आदीसह शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या