केसराळी येथील महालक्ष्मी मंदिराची दयनीय अवस्था !

[ बिलोली ता.प्र – सुनिल जेठे ]
बिलोली तालुक्यातील मौजे केसराळी येथे पुराणकालिन पोचम्मा मंदिर असलेले पाडून भव्य मंदिर बांधण्याचे स्वप्न पुढाऱ्यांकडून मातंग बांधवाना दाखवण्यात आले.

पण पोचम्मा मंदिर बांधण्यासाठी विलंब होत असल्यामुळे पोचम्मा देवीला लिंबाच्या वृक्षाखाली ठेवलेल्या देवीचे नैवेद्य कुञ्याच्या हवाली होत असल्याचे दिसत आहे. यामुळे भावना दुखावल्या जात असून पोचम्मा माता चे मंदिर बांधकाम करण्यात यावे अशी मागणी महिला भगींनीकडून करण्यात येत आहे.
सदरिल केसराळी येथील मातंग बांधवानी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना हाताशी धरुन पोचम्मा माता मंदिर बांधकासाठी समिती गठन करुन सर्व ग्रामस्थांनी लोक सभागातुन कांही रक्कम जमा केली. गेली दिड-दोन वर्ष लोटली पण पोचम्मा मंदिर बांधकाम करण्याचा विषय कोणी काढत नाहीत, ना कोणी करण्यासाठी समोर येत आहे.
पोचम्मा माता देवीच्या मंदीर बांधकामाला मुहूर्त सापडत नाही आहे. अशी भावना महिला व मातंग बांधवांकडुन व्यक्त करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ता तथा तंटा मुक्ती उपाध्यक्ष राजुभाऊ केसराळीकर यांच्याशी संपर्क करुन येथील पोचम्मा माता देवी मंदिरासाठी विषयी भुमिका जाणुन घेतली.
सदरिल मंदिरा बांधकामाचा विषय लवकरात लवकर निकाली लागावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. पोचम्मा देवीचे महिला भक्तांनी मंदिर बांधकाम विषयावर प्रतिक्रिया दिली. यादरम्यान राजूभाऊ केसराळीकर, याच प्रभागाचे मनोज गायकवाड, यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या