मंगल कार्यालय,टेन्ट हाऊस,केटरर्स,फोटोग्राफर असोसिएशन यांच्या वतीने आज राज्यव्यापी उपोषणास काँग्रेस चा पाठींबा!

( प्रतिनिधी नांदेड शहर-शेख मोईन )

 

मंगल कार्यालय,टेन्ट हाऊस,केटरर्स,फोटोग्राफर असोसिएशन यांच्या वतीने आज राज्यव्यापी उपोषण आयोजित करण्यात आलं होतं त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आमदार मोहनराव हंबर्डे,आ.अमरनाथ राजुरकर महापौर मोहिनीताई येवनकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते!”.

 

 

यावेळी बोलताना आमदार श्री. मोहनरावजी अण्णा हंबर्डे यांनी असोसिएशनतर्फे ज्या विविध तेरा मागण्या उपस्थित केल्या आहेत त्या सर्व मागण्या मुख्यमंत्री सन्माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या समोर मांडून संपूर्ण मागण्या पूर्ण करण्यास आपण प्रयत्नशील असू असा शब्द उपस्थितांना दिला..!

ताज्या बातम्या