के.रामलू पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ संपन्न !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
माध्यमिक शालांत परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत असताना विविध शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मांडले. नव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात एस.एस.सी बोर्डाच्या परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेचा पॅड व पेन भेटवस्तू देऊन त्यांना परीक्षेच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे अध्यक्ष श्री सायरेड्डी ठक्कुरवार तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या संचालिका रमा ठक्कुरवार, पालक प्रतिनिधी लक्ष्मण म्याकलवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवव्या वर्गातील कु. वैष्णवी निरडी व कु.मेधाश्री हिवराळे या विद्यार्थिनींनी केले. तर आभार प्रदर्शन शाळेचे पर्यवेक्षक श्री कागळे सर यांनी केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या