के. रामलू शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न !

[ कुंडलवाडी वार्ताहर – अमरनाथ कांबळे ]
आगामी येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2024 साठी प्रविष्ट होणाऱ्या इयत्ता दहावी वर्गातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी इयत्ता नवव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पंडित पाटील शिंदे सेवानिवृत्त शिक्षक तर प्रमुख पाहुणे म्हणून कुंडलवाडी पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे, दत्तात्रेय शेट्टीवार मु.अ. जिल्हा परिषद हायस्कूल कुंडलवाडी, अरविंद शिंदे तालुका अध्यक्ष पोलीस पाटील संघ, संतोष पाटील शिवशेट्टे पोलीस पाटील ममदापूर, सायरेड्डी ठक्कूरवार अध्यक्ष के. रामलू पब्लिक स्कूल, संचालिका रमा ठक्कूरवार, मुख्याध्यापक टी. नरसिंगराव उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती देवी व के.रामलू साहेबांच्या प्रतिमेचे पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावीच्या वर्गातर्फे शिक्षकांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी शालेय जीवन जगत असताना आलेले अनुभव व्यक्त केले.
उपस्थित मान्यवरांनी येणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षेचे नियोजन कसे करावे याबद्दल आपल्या मनोगतातून विचार व्यक्त केले व परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या. शै. वर्ष 2023- 24 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेप्रती उत्तरदायित्व समजून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी घसरगुंडी, सिसाॅ, डबलबार, असे खेळण्याचे साहित्य भेट दिले. मान्यवरांच्या हस्ते रिबीन कापून या खेळ साहित्यांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांनी सामान्य ज्ञान स्पर्धा घेतली.
त्यात प्रथम प्रसाद दिडशेरे, द्वितीय संकेत होरके तर तृतीय विवेक जोशी या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तर इयत्ता दहावीच्या वर्गशिक्षक उमाकांत कुलकर्णी सरांनी दहावीच्या विद्यार्थ्यांमधील विविध गुण शोधून त्यांना बक्षीस दिले. इयत्ता नववीचे विद्यार्थी व शिक्षकांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना पॅड व पेन दिले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या शेवटी परीक्षेविषयी संदेश देणारे नृत्य सादर केले.
बोर्ड परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना शाळेचे संस्थाध्यक्ष सायरेड्डी ठक्कूरवार, सचिव यशवंत संगमवार ,संचालिका रमा ठक्कूरवार, मु.अ.टी. नरसिंगराव, पर्यवेक्षक राजेश कागळे व सर्व शिक्षकवृंदांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग नववीचे विद्यार्थीनींनी केले. तर आभार प्रदर्शन उमाकांत कुलकर्णी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वर्ग नववी व वर्ग दहावीच्या विद्यार्थी व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या