प्रबोधनकार ठाकरे उद्यानाच्या दुरावस्थेला जबाबदार कोण?

( रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी- रजनीकांत जाधव )

प्रबोधनकार ठाकरे उद्यान हे खेड तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे.

एकरमध्ये असलेले उद्यान कित्तेक वर्षां पूर्वी विकसित होण्याकरिता प्रतीक्षा करीत होते, परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

चार वर्षांपूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने या उद्यान संदर्भा व्हिडिओ शूटिंग करण्यात आली होती. नगरपालिकेकडे त्याच प्रमाणे दीप वाहिनी ने प्रक्षेपण केले होते.

त्यानंतर या गार्डनच्या कामाला गती मिळालीही. गार्डन गेल्या वर्षापासून डेव्हलप करण्यात आले परंतु ते परिपूर्ण डेव्हलप झालेली नाही. त्याचे होणारे काम निकृष्ट दर्जाचे आहे. याकडे नगरपालिका प्रशासन नगरसेवक आणि इंजिनिअर व इतर अधिकारी यांचे दुर्लक्ष झाले आहे.

ते काम यावर्षी सुशोभीकरण करून तयार करण्यात यावे जेणेकरून खेड नगरपालिका परिसरातील आणि वयोवृद्ध व लहान मुले खेळताना बागडताना दिसावेत. 

चांगल्या प्रकारे विकसित  करण्यात यावे. बसण्यासाठी आरामदायी असणे गरजेचे आहे. सुशोभित शोची झाडे लावणे आणि डुब ग्रास, कार्पेट ग्रास लावण्यात यावे, कारंजे बसविण्यात यावे, मुलांसाठी खेळणी ठीक ठिकाणी बसविण्यात यावे अशाप्रकारे सुशोभित करण करावे, एवढेच जनतेची अपेक्षा आहे.

या गार्डन मध्ये रोशनाई असावी कारण या गार्डन मध्ये महायुद्धामध्ये लढावू  हेलिकॉप्टर ने जो पराक्रम दाखवला त्याची निशाणी म्हणून ते हेलिकॉप्टर या गार्डन मध्ये बसवण्यात आलेली आहे. जेणेकरून जनतेला यासंदर्भात माहिती मिळावी.

महायुद्ध मध्ये खेड तालुक्यातील दोनशे ते सव्वादोनशे जवान यांनी यांनी देशासाठी बलिदान दिले त्याचेच हे प्रतीक आहे म्हणून प्रबोधनकार ठाकरे उद्यान जगाच्या नकाशावर यावे अशाप्रकारे या उद्यानाचे काम झाले पाहिजे.

ताज्या बातम्या