ठाणे व मिरा-भाइर्दर महानगरपालिका क्षेत्रातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राला मंजूरी !

( ठाणे प्रतिनिधी – सुशिल मोहिते )

दि.२८/०१/२०२१….

  सविस्तर वृत्त असे की,दि.२८ जानेवारी २०२१ रोजी मंत्रालयामध्ये सामाजिक न्यायमंत्री श्री. धनंजय मुंडे यांच्या दालनामध्ये झालेल्या बैठकीमध्ये ठाणे व मिरा-भाइर्दर महानगरपालिका येथील दोन्हीं सांस्कृतिक केंद्राना मंजूरी देऊन त्वरीत निविदा प्रक्रिया करून काम चालू करण्याचे आदेश मंत्री महोदयांनी दिले.

ठाणे महानगरपालिका हद्दीतील आनंद नगर येथील महानगरपालिकेच्या सुविधा भुखंडावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येणार असून या कामी ९ कोटी ७५ लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ९० टक्के राज्य शासनाचा निधी उपलब्ध होणार असून १० टक्के निधी हा ठाणे महानगरपालिकेने द्यावयाचा असून, सदरची वास्तू पुर्ण झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या ताब्यात राहणार असून त्याची निगा व देखभाल ठाणे महानगरपालिका करणार आहे.

त्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजूरी ही दिलेली आहे. अशाच पध्दतीने मिरा-भाइर्दर महानगरपालिका क्षेत्रातील महसूल खात्याची जमिन सामाजिक न्याय विभागाच्या ताब्यात दिलेली असून त्याठिकाणी १३ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ९० टक्के राज्य शासन व १० टक्के खर्च हा मिरा-भाइर्दर महानगरपालिका करणार असून त्यांचीही निगा व देखभाल सदरची वास्तू पुर्ण झाल्यानंतर मिरा-भाइर्दर महानगरपालिकेकडे सोपविण्याचा शासनाचा निर्णय झालेला आहे.

तसेच मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने ही मंजूरी ही दिलेली आहे.

दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असलेल्या ठाणे व मिरा-भाइर्दर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आंबेडकर अनुयायांची संख्या सातत्याने वाढत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरामध्ये या केंद्राची निर्मिती व्हावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे होत होती.तसेच या वास्तूमध्ये विपश्यना केंद्र,लायब्ररी व राहण्याची व्यवस्था होत असल्याने परगावाहून येणा-या आंबेडकरी अनुयायांना त्याचा फायदा होणार आहे.या दोन्हीं प्रस्तावाना मंजूरी देत असताना गरज पडल्यास या केंद्रांसाठी शासन निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्र्यांनी दिली.त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राला राज्य शासनाच्या वतीने सामाजिक न्यायमंत्री श्री.धनंजय मुंडे यांनी बैठक घेऊन त्वरीत मंजूरी दिल्याबद्दल आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांचे आभार मानले.

सदरच्या बैठकीच्या वेळी श्री.श्याम तागडे – प्रधान सचिव, सामाजिक न्याय, डॉ. प्रशांत नारनवरे – आयुक्त, समाज कल्याण, श्री. दिनेश डिंगळे – सामाजिक न्याय विभाग, डॉ. विजय रानडे – मिरा-भाइर्दर आयुक्त, श्री.रविंद्र खडताळे – सिटी इंजिनियर, श्रीमती. वंदना कोचुरे – प्रदेशिक उपायुक्त कोकण उपस्थित होते.

ताज्या बातम्या