दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया रायगड जिल्हा अंतर्गत करजत तालुका शाखा विभाग क्रमांक ८ यांंच्या विद्यमाने श्रामणेर बौद्धाचार्य शिबीर !

आकुरले येथे गुरूवारी दि १० फेब्रुवारी २०२२ रोजी मोठ्या उत्साहात महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आद. महेंद्र मोरे करजत तालुका अध्यक्ष आद के.के. गाढे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

श्रामणेर संघास दिक्षा पु. भंते महेंद्र बोधी यांनी दिली या शिबिरात २५ शिबीरार्थींनी भाग घेतला आहे. या शिबीरास राज्य कोषाध्यक्ष स.जा.कवडे, जिल्हाध्यक्ष काशिनाथ कांबळे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी जिल्हा कोषाध्यक्ष राजेंद्र क्षिरसागर, तालुका सरचिटणीस रविंद्र जाधव, कोषाध्यक्ष ए.डी.जाधव,  संस्कार उपाध्यक्ष मारूती गायकवाड व सर्व कार्यकारिणी, रायगड जिल्हा संघटक सुरेश गायकवाड, गणेश केदारी, जिल्हा सचिव के.के निकाळजे, रमेश गायकवाड, पी.एस गायकवाड, बहुजन युथ पॅंथर संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुशिल जाधव, खोपोली शहर अध्यक्ष आनंद सोनावणे, अशोक नवतरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत धनवटे, समता मित्र मंडळ तांबस व सर्व मंडळाचे पदाधिकारी दिपक जाधव व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.
विभाग नं ८ चे सर्व पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष आद शाम रोकडे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किसन रोकडे व मधुकर शिंदे यांनी केले. तसेच पनवेल तालुका सरचिटणीस राहूल गायकवाड उपस्थित होते. सर्व आजी माजी तालुका पदाधिकारी सर्व विभाग अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. या शिबीराचा समारोप १९ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी २ वा होणार आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या