दि म्हसळा टाईम्सचा आणखीन एक उपक्रम !

[ रायगड /म्हसळा प्रतिनिधी – प्रा.अंगद कांबळे ]
दि म्हसळा टाईम्स आणि परिवार यांच्या माध्यमातून शनिवार दि. 26/2/2022 या रोजी म्हसळा तालुक्यातील मु. ढोरजे या गावी श्री पांडुरंग चव्हाण यांच्या निवासस्थानी अधिकृतपणे वृत्तपत्र आणि बौद्धिक प्रगल्भतेसाठी पुस्तके असा वाचनालयाचा शुभारंभ करण्यात आला.
वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल. ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे जे, जे आपणासी ठाये ते, ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकलजन. या उक्तीनुसार दि म्हसळा टाईम्स आणि परिवाराने केलेला संकल्प वाचनालयाचा शुभारंभ करून एक पाऊल पुढे टाकले आहे.
या कार्यक्रमास कोकण मराठी साहित्य परिषदेचे रायगडचे अध्यक्ष मा. सुधीरजी शेठ, समन्वयक रायगड श्री.अ.वि जंगम, कुणबी समाजसंघ मुंबई उपाध्यक्ष मा.श्री बबनराव उंडरे, महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य मा.कृष्णाजी कोबनाक साहेब, रायगड भूषण रामचंद्रजी म्हात्रे प्रा.शेख, श्री दिनेश काप, सूर्यकांत तांबे, श्री प्रफुल पाटील, श्री.राजेश चव्हाण, सौ मीना गिजे, उपसरपंच देवघर, दि म्हसळा टाईम्स चे संस्थापक संपादक श्री रमेशजी पोटले, ग्रामस्थ कार्यकर्ते व महिला मंडळ, दि.म्हसळा टाईम्सचे पत्रकार श्री उत्तरकर सर्व परिवारगण वाचनालयाच्या शुभारंभी उपस्थित होते.
मा.श्री कृष्णाजी कोबनाक, मा.श्री बबनराव उंडरे, मा.श्री सुधीरजी शेठ, मा.श्री.अ.वि जंगम, मा.श्री रामचंद्रजी म्हात्रे, मा.श्री.प्रा.शेख या वक्त्यांनी योथोचीत असे मार्गदर्शन वाचनसंस्कृतीचे महत्व पटवून देनारी उद्बोधकपर भाषणे करून सर्वांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मा.श्री तांबे व श्री प्रफुल पाटील सर यांनी केले. तर उपस्थित प्रमुख अथिति आणि वक्ते यांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. हा अवर्णणीय कार्यक्रम दि म्हसळा टाईम्स आणि परिवाराचे अध्यक्ष मा.श्री. रामचंद्रजी म्हात्रे (रायगड भूषण ) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला व उपस्थितांचे आभार अध्यक्ष यांच्या वतीने करण्यात आला.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या